<
जळगांव – (प्रतिनिधी)-येथिल “जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित” संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर मागील काही वर्षापासून दहशत निर्माण करणारे विजय भास्कर पाटील पियुष पाटील व त्यांच्या गुंड टोळी विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशन प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्याने संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मे. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी याचिका क्र. ७२०/१९ दाखल केली होती.
या याचिकेत मा. न्या. श्री नलावडे व मा.न्या. श्री. सोनवणे यांच्या खंडपीठाने विजय भास्कर पाटील व त्यांच्या गुंडांन विरोधात मोक्का वा अन्य कोणती प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल, याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन प्रशासनाला नाईलाजास्तव यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात करावी लागली. मागील आठवड्यात या संदर्भात जिल्हा पेठ पोलीस स्टेशन प्रशासनाने संस्थेचे प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. या कारवाईस जवाब नोंदवण्यासाठी अनेक शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी पुढे येत आहेत. अशी माहिती नुतन मराठा महाविद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप दयाराम पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.