<
जळगांव/नगर(प्रतिनीधी)- शिक्षणासाठी प्रयास हिवरेबाजार परिवाराचा चा पुढाकार इतर देशातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात आलेल्या अनुभवांवर राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी सहसंचालक दिनकर टेमकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय उपक्रम. राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षकांची राज्यस्तरीय व्यापक बैठक. सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा शोभाताई पवार यांचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब तसेच सहसंचालक दिनकर टेमकर साहेबांचे उपस्थित २५ ऑक्टोबर रोजी हिवरे बाजार ता.नगर जि.अहमदनगर येथे ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रयास फाउंडेशन व हिवरेबाजार परिवार आयोजित तसेच राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या सहभागाने शिक्षण परिषद तसेच राज्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची बैठक हिवरे बाजार तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे शुक्रवार दिनांक २५ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली असून यावेळी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांची देखील विशेष उपस्थित राहणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राज्यातील प्रयोगशील व राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना उपस्थितीचे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या महिला राज्यअध्यक्ष शोभाताई पवार यांनी आवाहन केले असून याच दिवशी या ठिकाणी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांची राज्यस्तरीय मंथन बैठकराज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे असे त्या म्हणाल्या.
दि.२५शुक्रवार रोजी हिवरेबाजार येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासंदर्भात बोलताना हिवरेबाजार परिवाराच्या वतीने शोभाताई पवार म्हणाले की सामाजिक शैक्षणिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचा हेतू समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर शाळा हा महत्वाचा दुवा आहे . त्याच अनुषंगाने मागील महिन्यात पोपटराव पवार यांनी जपान आणि सिंगापूर या देशाचा दौरा केला.
या मध्ये त्यांनी अनुभवलेली तेथील नीती, मूल्य, गुणवत्ता व शिक्षण व्यवस्था तसेच पर्यावरण पुरक समाजव्यवस्था यावर राज्यातील उपक्रमशील तसेच राज्य शासन व जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व याशिवाय नावीन्यपूर्ण प्रयोगशील वाटा चोखाळणाऱ्या प्रातिनिधिक सर्जनशील शिक्षकांसमोर मनोगत व्यक्त करायचा त्यांचा मानस आहे. या राज्यस्तरीय चर्चासत्रातून नक्कीच चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्यामुळे आपण आवर्जुन उपस्थित राहावे ही विनंती. तसेच पोपटराव पवारांचा मुलगा प्रसन्न हा अग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे . त्याने त्याच्या सहकार्यांना सोबत घेऊन प्रयास या सामाजिक संस्थेची स्थापना करून विविध सामाजिक विषयांवर ते काम करत असतात.
यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शाळांच्या माध्यमातून राज्यभर बीजगोळे निर्मिती उपक्रम राबवून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने चांगला प्रयत्न केला. या प्रयत्नांना सहकार्य करणाऱ्या शाळांचा सन्मान ते करू इच्छितात तसेच या माध्यमातून त्यांच्यासोबत जोडले गेलेल्या उपक्रमशील शिक्षकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व इतरांचे चांगले विचार, संकल्पना घेण्यासाठी एक व्यासपीठ देण्याचा प्रसन्न व प्रयास टीम चा मानस आहे.
आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सदरील कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब तसेच सहसंचालक दिनकर टेमकर साहेब दोघेही आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य शासनआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचे उपस्थितत राज्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची विस्तारित व्यापक मंथन बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. तसेच पोपटराव पवार, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, सह संचालक दिनकर टेमकर, यांच्यासोबत किशोर पाटील कुंझरकर यांचे नेतृत्वाखाली प्राथमिक चर्चा देखील यानिमित्ताने याच दिवशी याच ठिकाणी आयोजित केलेली आहे अशी माहिती राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या महिला विभागाचे अध्यक्ष शोभाताई पवार व हिवरे बाजार परिवार यांनी दिली.
राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व संघटना प्रतिनिधींनी उपस्थिती संदर्भात ७०३०८८७१९०, ७५८८०९२०२४, ह्या मोबाईल क्रमांकावर दि.२३ ऑक्टोबर बुधवार पूर्वी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान सर्वांच्या भोजनाची व्यवस्था हिवरेबाजार परिवाराने केलेली आहे.दरम्यान २५ऑक्टोंबर शुक्रवार रोजी शिक्षणाच्या संदर्भात हिवरेबाजार परिवाराने राज्याचे विधायक कार्याचे प्रेरणास्रोत पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक यांचे सादरीकरण, १२:००ते १:०० स्नेहभोजन, १:०० ते १.३० हिवरेबाजार शाळा व गावातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण, १:३० ते २:०० राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाची विस्तारित राज्य कार्यकारिणी व मंथन रूपरेषा बैठक, २:०० ते २:३० शिक्षक कवींचे कवी संमेलन(चहापान) संपन्न होणार आहे. शिवाय हिवरे बाजार शिवार फेरी. अशा स्वरूपाचा कार्यक्रम असून दिवाळीच्या सुट्टीचा प्रथम दिवशी राज्यात शैक्षणिक समृद्धी नांदावी यासाठी प्रयास व हिवरेबाजार परिवाराच्याच्या माध्यमातून राज्यातील प्रयोगशील व राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या सर्व शिक्षकांचे उपस्थित शिक्षक व शिक्षण व्यवस्था अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच शिक्षकांच्या समस्या व नवनवीन कल्पनांना आकार देण्यासाठी हा उपक्रम लक्षवेधी असल्याचे सर्वांनी लाभ घ्यावा व या माध्यमातून राज्यस्तरावर एकत्रित यावे असे मंत्रालय पातळीवर सातत्याने शिक्षक व शिक्षणाच्या हितासाठी पाठपुरावा करणारे प्रयोगशील शिक्षक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटीलकुंझर कर यांनी म्हटले.