<
भडगांव-प्रतिनिधी (हेमंत विसपुते) – रूग्नालयाची 30 खाटावरून 50 खाटापर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी आमदार कीशोर पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
भडगाव येथे सध्या ग्रामीण रूग्नालय कार्यरत आहे. मात्र तालुक्यातील रूग्नाची संख्या व त्यासाठी अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 30 खाटांच्या भडगाव ग्रामिण रूग्नालयाला 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्नालयामधे श्रेणीवर्धन करण्याचा आज निर्णय घेतला. याबाबत आरोग्य विभागाने शासन निर्णय काढला आहे.
आरोग्य सुविधा मिळणार
भडगाव ग्रामिण रूग्नालयाला उपजिल्हा रूग्नालयाच्या श्रेणीवर्धन करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने तालुक्यात आता जिल्हा रूग्नालयाच्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय खांटाची संख्या ही वाढणार आहे. सद्य:स्थितीला भडगाव ग्रामिण रूग्नालयाची 30 खाटांची क्षमता आहे. आता ती क्षमता 50 एवढी होणार आहे. त्यामुळे खांटाअभावी रूग्नांना गैरसोय होणार नाही. खाटांची क्षमता वाढल्याने पर्यायाने वैद्यकीय अधिकार्याची संख्याही वाढणार आहे. शासानाच्या या निर्णयाने भडगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे. भडगाव ला ग्रामीण रूग्नालयाला उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा मिळाल्याने आमदारांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
प्रतिक्रिया
भडगाव ग्रामिण रूग्नालयाला उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे मोठे समाधान आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. पाचोरा येथे उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा व इमारात बांधकामाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव