<
उपस्थितांशी बंजारा भाषेतुन साधला संवाद
वावडदा/जळगाव(प्रतिनीधी)- बंजारा व ओबीसी समाजाच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी बंजारा सेनेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला असून जळगाव ग्रामीण चे उमेदवार ना.गुलाबराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवण्याचे आवाहन आमदार हरीभाऊ राठोड यांनी केले. स्वर्गीय वसंतराव नाईक व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचा दाखला देतांना बंजारा समाजाने मोठ्या ताकदीने शिवसेने सोबत आपण उभे रहावे असे अवाहन त्यांनी बंजारा समाजाला केले. वावडदा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य पवन सोनवणे होते. रविंद्र कापडणे. आप्पा राठोड संमाधान चिंचोरे. धोडु जगताप. पि.के.पाटील. प्रास्तविक रमेश आप्पा पाटील यांनी केले. पाथरीचे सरपंच शिरीष जाधव यांनी मनोगत व्यक्त करतांना ना.गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी वावडदा येथील गोपाळ समाजहीत संघाच्या वतीने आ.हरीभाऊ राठोड यांना निवेदन देण्यात आले.