<
भडगांव-(प्रमोद सोनवणे) – येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली भडगांव शहरात रूट मार्च करण्यात आले. पोलिस स्टेशनपासून पाचोरा चौफुली, पारोळा चौफुली, टोणगांव, यशवंत नगर,आझाद चौक या मार्गक्रमणाने पथसंचलन करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचीत प्रकार घडु नये तसेच विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना आवाहन करण्यात आले की त्यांनी कुठेही गालबोट लागणार नाही यांची दक्षता घेऊन पोलिसांना सहकार्य करावे. या वेळी गुजरात राज्यातून पोलिसांची एक तुकडी चे पाचारण करण्यात आले आहे तरी भडगांव शहरातील सर्व नागरीकांनी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. सुरक्षतेसाठी पोलिस यत्रंणा पुर्णपणे सज्ज असून धंनजय येरूळे पोलिस निरीक्षक भडगांव यांनी भडगांव वासियांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पथसंलनावेळी लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, पोलिस स्टेशनचे सर्व स्टाॅप ने परिश्रम घेतले.