<
पारोळा(प्रतिनिधी) – पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत, जळगावातील घटना ताजी असतानांच, अशिच निंदनीय घटना पारोळा शहरात घडली आहे. सविस्तर असे की, पारोळा शहरातील मध्यवस्तीत विद्यानगर येथे केबलचे काम पाहण्यासाठी गेलेले पत्रकार बाळू पाटील व त्यांचे मित्र दीपक भावसार पत्रकार हे उभे असताना त्याच वेळेस पारोळा शहरातील नगरसेवक महेश चौधरी याने कसलीही चौकशी न करता शिवीगाळ देण्यास सुरुवात केली व बाळू पाटील यांना धक्काबुक्की करीत दूर लोटले महेश चौधरी व त्यांच्यासोबत असलेल्या अज्ञात इसमा बाबत आज फिर्यादी बाळू पाटील पत्रकार यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक महेश चौधरी यांच्यावर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला असुन सदर गुन्ह्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच्या वतीने आज माननीय तहसीलदार गव्हाणे तसेच पोलिस निरीक्षक खैरनार यांच्याकडे पत्रकार संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर व कडक कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला सदर निवेदनाची प्रत प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन देण्यासाठी जळगाव पाचोरा पारोळा भडगाव अमळनेर येथील पत्रकार बांधव उपस्थित होते यात हेमंत विसपुते योगेश आर पाटील अनिल पाटील छोटू सोनवणे रावसाहेब भोसले अभय पाटील योगेश पाटील अकबर बेग सय्यद बेग मिर्झा रमेश कुमार जैन प्रतीक भूपेंद्र मराठे प्रमोद सोनवणे किशोर रायसाकडा दीपक भावसार व बाळू पाटील हे उपस्थित होते.