<
मुंबई (प्रतिनिधी) मुंबई मधील डोंगरी येथे कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचं पथक करत आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचे बळी गेले असून ९ जण जखमी आहेत. अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत.
डोंगरी येथे कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचं पथक करत आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचे बळी गेले असून ९ जण जखमी आहेत. अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी डोंगरी भागातली केसरबाई इमारत कोसळली. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मुंबईतील सर्व तीनही तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीपर्यंत जाणारा रस्ता अतिशय चिंचोळा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. त्यातच बघ्यांची गर्दी, लोकप्रतिनिधींचा जत्था आणि माध्यमांची गर्दी यामुळे बचावकार्यात कृत्रिम अडथळेही खूप आले. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या, २ रेस्क्यू व्हॅन तर एनडीआरएफचे ९३ जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
ढिगाऱ्याखालून बाहेर काढत असलेल्या जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ वैद्यकीय सेवेच्या १८ रुग्णवाहिका, २ बाईक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय नजीकच्या इमामवाडा महापालिका शाळेत करण्यात आली. या रहिवाशांनी जवळचा मदरसा, दर्ग्यात आश्रय घेतला होता. या ठिकाणी अनेक एनजीओंनी त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली आहे.
मृतांची नावे –
१) साबिया निसार शेख (२५)
२) अब्दुल सत्तार कालु शेख (५५)
३) मुझमील मन्सूर सलमानी (१५)
४) सायरा रेहान शेख (२५)
५) जावेद इस्माइल (३४)
६) अरहान शहजाद (४०)
७) कशफ अमीरजान (१३)
८) सना सलमानी (२५)
९) झुबेर मन्सूर सलमानी (२०)
१०) इब्राहिम (१ वर्ष सहा महिने)
जखमींची नावे
१) फिरोज नाझिर सलमानी (४५)
२) आयेशा शेख (३)
३) सलमा अब्दुल सत्तार शेख (५५)
४) अब्दुल रहमान (३)
५) नावेद सलमानी (३५)
६) इम्रान हुसैन कलवानिया (३०)
७) जाविद (३०)
५) जीनत (२५)