<
एरंडोल-(प्रतिनीधी) – येथे आज दि. १८/१०/२०१९ रोजी तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांनी पंचायत समिती एरंडोल येथे मतदार जनजागृती अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना बोलावुन मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी तहसिलदार मँडम यांनी उपस्थित सेविकांना मतदान जनजागृतीपर मार्गदर्शन केले. या प्रसंगी बि. डी. ओ. मंजुषा गायकवाड हे सुध्दा उपस्थित होते,यावेळी तहसिलदार मँडम यांनी बोलतांना सांगीतले की,तालुक्यातील मतदानाची परीस्थिती पाहता लक्षणीय घट जाणवत असल्याने एकूण मतदान हे फक्त ६०%च होत असल्याने आपण सर्वांनी एकञ येऊन जनमानसात मतदानाविषयी त्याचबरोबर आपल्या नैतिक हक्काविषयी जनजागृती करणे गरजेचे असून प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहीजे,मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क अाहे तसेच महीलांनी अवश्य मतदान करावे. बरोबरच आपली कर्तव्ये व जबाबदार्यांप्रती प्रत्येकाने सदैव जागरूक राहणे गरजेचे असल्याने मतदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगीतले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. सुनंदा महाजन,छाया सपकाळे, शैलजा शरद पाटील, भारती सुतार, विजया बडगुजर तसेच ईतर पर्यवेक्षिका यांनी परीश्रम घेतले.