<
फैजपूर शहरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी अपंग मतदारास मतदान कक्षात नेतांना तलाठी प्रशांत जावळे
फैजपूर(शाकिर मलिक) -शहरात चोवीस हजार एकतीस मतदानापैकी पंधरा हजार पाचशे सत्याण्णऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ६४.९० टक्के झाले.१९ केद्रांवर सकाळ पर्यंत प्रत्येक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.मात्र दुपारी १२:०० वाजेच्या पुढे रांगा थंडावल्या होत्या. तर दुपारी ३:०० वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाच्या हक्कासाठी जोर धरला होता.
यावेळी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा उच्चांक नोंदविला .भाजपाचे हरिभाऊ जावळे,काँग्रेसचे शिरिषदादा चौधरी, अपक्ष अनिलभाऊ चौधरी, एम.आय.एम चे विवेक ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे हाजी सय्यद मुस्ताक, बहुजन समाज पक्षाचे संतोष ढिवरे या पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष गयाउद्दिन काझी डि.डि.वाणी, राजाराम सोनार,संजय तडवी हे १० उमेदवार मतपेटीत बंद झाले.
खरी लढत भाजपाचे हरिभाऊ जावळे, काँग्रेसचे शिरिषदादा चौधरी, अपक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्यात होत असून या तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मताधिक्य कसे जास्त मिळेल यासाठी कामाला लागले होते. काही ठिकाणी पैशांचा पाऊस पडत होता. शहरात शांततेत मतदान झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याकामी एपीआय प्रकाश वानखडे सह पोलीस स्टॉप,होमगार्ड स्टॉप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनीही प्रत्येक केंद्रावर भेटी दिल्या. तर फैजपुर भागाचे सर्कल जे.डी.बंगाळे,तलाठी प्रशांत जावळे, तलाठी सहाय्यक संजय राजपूत, कोतवाल तुषार जाधव, डी.एन.तायडे हे १९ मतदार केंद्रावर नियंत्रण ठेवून होते.