<
एक हात मदतीचा- माणसातील माणूसकीपण जपण्याचा
जळगांव(प्रतीनिधी)- आपण दिवाळी साजरी करतांना समाजातील एक वर्ग असा आहे, ज्यांना दोन वेळचे पोटभर अन्नही मिळत नाही. त्यामुळे दिवाळीचा फराळ त्यांच्या घरी बनतच नाही. अशा गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी आपुलकीची दिवाळी उपक्रम मौलाना आझाद फाउंडेशन आणि सच्ची निःस्वार्थ सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त गरीब व गरजूंना मोफत कपडे व फराळ वाटप कार्यक्रम आज २५ रोजी उस्पुर्त रित्या पार पडला. काही गरीब व गरजू लोकांच्या घरी आर्थिक परिस्थिती मुळे दिवाळी साजरीही केली जात नसेल, ज्या लोकांना अंगावर घालण्या साठी व्यवस्थित कपडे घेता येत नाहीत अश्या लोकांसाठी मौलाना आझाद फाउंडेशन व सच्ची निःस्वार्थ सेवा गृप ने उपक्रम राबवून जळगांव तालुक्यातील उजाड कुसुंबा येथील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी-भिल्ल समाजातील लोकांना फराळ, महीलांना साड्या, लहान मुलांची कपडे, मुलीं साठी ड्रेस, पुरूषां साठीची कपडे, वाटप करण्यात आले. ऐन दिवाळीत सर्व प्रकारचा फराळ आणि चांगले कपडे मिळाल्याने या सर्वांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. उजाड कुसुंबा या गावातील सुमारे शेकडो जणांनी याचा लाभ घेतला. आपण आपल्या कुटुंबियांसह आनंदाने दिवाळी साजरी करत असताना, ज्यांच्या घरात आर्थिक परिस्थिती अभावी दिवाळीचे पदार्थ बनत नाहीत, त्यांनाही सामावून घेऊ या. असे उद्गार मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांनी काढले. या समाजोपयोगी उपक्रमाला नोबल स्कूलच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी, राजेश जाधव, सुवर्णलता अडकमोल यांचे सहकार्य लाभले तर या वेळी सच्ची निःस्वार्थ सेवा गृपच्या अध्यक्षा निशा पवार, विजय पवार, मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, हर्षल मावळे, चेतन निंबोळकर, मिना परदेशी, अग्रवाल मॅडम, राकेश बाऊस्कर, सोनम बाऊस्कर आदी उपस्थित होते.