<
सामजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांचा जिल्ह्यातील राजकारनावर दृष्टिक्षेप.
जळगांव-(धर्मेश पालवे)-आज बळीराजा चा दिवस, पण बळीराजा हाच संकटात सापडलेला आहे. अतिरिक्त पावसाने होते नव्हते, ते नासवून टाकले. बळी हवालदिल झाला. आता अनेक आमदार बळीचे संतान आहेत. पण शहरात गेल्यानंतर ते व्यापारींचे दत्तक बनले. विखरणचा ऊक बळी जरी विधानसभा गैलरीत विष पिऊन मेला तरी या आमदारांना दुख झाले नाही. मेला तर मेला, त्याच्या बायकोला चेक देऊन मोकळे. अशा आमदाराची चीड आली, शिवी हासडली, पण त्याच बळीच्या भाऊ, दादा, काका, डिकरा, खोकराने तोच हरामी आमदार निवडून दिला. येथेच बळीचा पराजय झाला. आधी बळी गेला आता उरले सूरले ते ही गेले. आजसुद्धा बळीची संतान सांगणाऱ्यांनी वामनाला गुरु मानले, ज्याने बळीचा बळी घेतला होता. वामनाला मुख्यमंत्री मानले, जो बळीच्या संतानाची सर्कस चालवतो. येथेच बळीचा पराजय आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून बळीसाठी सरकार खूप काही वाढून ठेवते. पण सरकारचे नोकर, जे स्वताला बळीची औलाद सांगतात त्यांनीच मधल्या मधे फस्त केले. आता ही कसली बळी ची औलाद? ही तर लुटारूंची पिलावळ. शेतकऱ्याचा मुलगा पोलीस बनला तर शेतकरी चे लायसन विचारून शंभर रूपये हिसकावून घेतो.शेतकरी चा मुलगा तलाठी बनला तरी आठाणाच्या सातबारासाठी वीस रूपये घेतो.खरेदीच्या नोंदीनुसार फेरफार नोंदीसाठी दहा हजार लाच घेतो. शेतकरी चा मुलगा ग्रामसेवक बनला तरी बारा हजाराचे शौचालयाचे अनुदान साठी दोन हजार लाच घेतो. घरकुल साठी एक लाख वीस हजाराच्या अनुदानसाठी वीस हजार लाच घेतो. तहसीलदार, बीडीओ, फौजदार यांनी तर कहर केला आहे.ते तर बळीचे कसले,भारतीय नाहीतच! ते तैमूरलंग, चंगीझखान, नादिरशहापेक्षाही जास्त हापापलेले.
आता सांगा, हे नोकर खरेच बळीची औलाद असेल का? मला नाही वाटत, तसे.आणि बोंडअळीच्या नुकसान भरपाई साठी, कर्जमाफीसाठीच्या, घरकुल साठीच्या आंदोलनातून मी प्रत्यक्ष अनुभवातून ठामपणे सांगतो, आमचे हरामखोर आमदार याच लुटारूंकडून हप्ते घेऊन शेतकऱ्यांना लुटण्याचा परवाना देतात. तरी म्हणे हे बळीचे संतान? शक्यच नाही. ही एरागैराची संतान आहे, जेंव्हा त्यांचा बाप पंढरपूर गेला असेल, काशी गेला असेल, दवाखान्यात पडला असेल. आज बळीराजाच्या दिनानिमित्त बळीची पैदास असलेले,छर खरेच असतील तर, सरकारी नोकरांनी शपथ घेतली पाहिजे, मी आजपासून फक्त सेवा करीन ,पगार घेईन. बळीची लूट करणार नाही. हिंमत असेल तर ,दानत असेल तर ,या म्हणावे पुढे!…शिवराम पाटील.९२७०९६३१२२.