<
पाचोरा(प्रतिनीधी)- परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वच शेतीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी सर्व लोक प्रतिनिधी यांना सोबत घेउन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाचोरा येथे व्यक्त केले आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह मोठया प्रमाणावर शेतकरी बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.