<
जळगांव(धर्मेश पालवे):-कापसावरील लाल्यारोग, केळीचे वादळामुळे नुकसान आणि बोंडअळीच्या नुकसानभरपाई साठीचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी शेतावर न जाता खोटी माहिती तहसीलदारांना दिली होती. परिणामी अनेक शेतकरी नुकसान भरपाई साठी वंचित राहिले म्हणून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पुढचे संकट पाहता जिल्हा जागृत जन मंच कडून निवेदन देण्यात आले.निवेदनात तलाठी, कृषीसहायक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांना प्रत्येक गावात संयुक्तपणे ग्रामसभा बोलवावी. प्रत्येक शेतकरी कडून पिकपेराची सर्वांसमक्ष तोंडी माहिती घेऊन नोंद घ्यावी.शेतकरी व शेजारील शेतकरी सांगतील तितके क्षेत्राची नुकसान झाल्याबद्दल विशेष नोंद करावी. आणि त्या त्या शिवारातील शेतकऱ्यांची टिम सोबत घेऊन प्रत्यक्ष नुकसानीचा पंचनामा करावा. नुकसानीचा पंचनामा ची प्रत त्याच टिमसमोर तेथेच शेतकरी ला सोपवावी. शिवारातील सर्व गटाची शेतकरी च्या नावासहित नुकसानीची टक्केवारी व क्षेत्राची एकत्रित यादी ग्रामपंचायत कार्यालयात २४ तासात प्रदर्शित करावी. यासह एकत्रित यादी संबंधित तहसीलदार, तालुका कृषी आधिकारी, बीडीओ यांचेकडे २४ तासात सादर करावी. पंचनामा प्रतीवरच गांव, तालुका, जिल्हा,शेतकरीचे नाव , गट नंबर, क्षेत्र, पिकाचे नांव, लागवडीचे क्षेत्र, नुकसान झालेले क्षेत्र, एकच ठिकाणी नमूद करावी. शेतकरी च्या खात्यात नुकसान भरपाई ची रक्कम टाकलेल्याची लेखी नोटीस प्रत्येक शेतकऱ्यांना तलाठीने द्यावी. पंचनामा ते नुकसान भरपाई ची रक्कम मिळेपर्यंत सर्वाधिकार एकाच आधिकारी कडे देऊन संपूर्ण तेच जबाबदार असल्याचे लेखी नमूद करावे. जेणेकरून जबाबदारी ची टाळाटाळ करता येऊ नये.पात्र शेतकरी ला वंचित ठेवणे किंवा अपात्र शेतकरी ला लाभ दिल्याचे सिद्ध झाल्यास जबाबदार कर्मचारी वर सक्त कारवाई करण्यात यावी . अश्या आशयाच्या बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. सदर निवेदन देतांना जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील, ईश्वर मोरे, सरोज पाटील , अमोल कोल्हे, गुरुनाथ सैदाने आणि धर्मेश पालवे आदी हजर होते.