<
कोलकत्ता पं. बंगाल येथे 4 ते 8 नोव्हेंबर 2019 दरम्यान स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया वतीने होणाऱ्या स्पर्धेत सी. बी. एस. सी. सोशल वेल फेअर कडून जाण्याऱ्या संघात कुमार किशोर पाटील व सुब्रो खानरा यांची निवड झाली. सी. बी. एस. ई वेलफेअर सोशल ऑर्ग नाय झेशन तर्फे ऑल इंडिया स्तरावर योग निवड चाचणी घेण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय योगपंच डॉ. अनिता पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. ह्या स्पर्धा जाणता राजा ज्ञान व बल साधना केंद्र जळगांव येथे २२आँक्टोबर ला संपन्न झाल्या ह्या निवड चाचणीला चैनइ, राजस्थान , नगर, पुणे नाशिक आशा बऱ्याच ठिकाणाहून विदयार्थी आले होते 60 विद्यार्थी हजर होते. येथे निवड झालेला संघ हा 65व्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या कलकत्ता येथे सी. बी. एस. इ. सोसिकं वेलफरे ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधित्व करणार आहे. ह्या स्पर्धेत रुस्तमजी शाळेचे कुमार किशोर पाटील व सुब्रो खान्ररा यांची निवड झाली आहे. ह्या दोघांना डॉ. अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कुमार व सुब्रो यांना जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर पाटील यांनीही शुभेच्या दिल्या.