जळगांव(विशेष प्रतिनिधी)-सेंट्रल ड्रग्स स्टेडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या भारतीय औषधी गुणवत्ता, सुरक्षा, व क्षमता तपासनी करणाऱ्या समितीने आणि भारतीय ड्रग्स कंट्रोलर च्या अहवाल समितीने एसेडिटी साठी वापरात येणाऱ्या रेंटेडीन या औषधीत असणाऱ्या नायट्रोसेमीन या घटक द्रव्यापासून कँसर चा धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे. सदर स्पष्टता ही भारताबाहेरील राष्ट्राच्या अहवालावरून केली असून भारतात या घटकद्रव्या पासून बनणाऱ्या झेंटेक, रेंटक, ऍसिलॉक, या ओषधी गोळ्या व इंजेक्शन स्वरूपात बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व औषधी मेडिकल, दवाखाने व जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या क्लिनिक मध्ये वापरणे साठी बंदी सुरू केली आहे. सदर अहवाल सर्व भारतभर ही औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना, वापरत असणाऱ्या डॉक्टर, फार्मा व समिती संघटनांना प्राथमिक स्वरुपाचा आदेश रुपात तूर्तास हे इंजेक्शन वापरनेस बंद कळवण्यात आला आहे.
रुग्णांनी घाबरून जाऊ नये
चौकशी अंती समजले की, या औषधीवर बंदी जरी असली तरी मात्र, सदर औषधी वापरण्यास तज्ञ डॉक्टर च्या सल्ल्याने घेणे फायद्याचे आहे.भारतात ही औषधी उत्पादन करणाऱ्या कम्पन्यानी हा अहवाल फेटाळला असून,तूर्तास तरी भारतात अस सिद्ध झाल्याचं स्पष्ट नाही.आणि त्याच बरोबर ही औषधी उत्पादने वापरात आल्याने कँसर झालेले रुग्ण आढळले नसून याबाबत संभ्रम असल्याच काही ठिकाणी बोलले जात आहे.