<
जळगाव – सुट्टींमध्ये परिवारासोबत सुट्ट्या घालवायला कुणाला आवडणार नाही. परिवारासोबत निवांत वेळ घालवणे यापेक्षा मोठा आनंद जगात नाहीय. परिवारासोबत सुटीचा आनंद लुटण्यासोबतच जर लाखोंची बक्षिसे मिळत असतील तर? आहे ना अनोखी संधी? रतनलाल सी. बाफना गो-सेवा अनुसंधान केंद्रातर्फे ही अनोखी स्पर्धा म्हणजेच अहिंसातीर्थ संस्कार स्पर्धा २०१९ मध्ये ही संधी सर्वांसाठी आलेली आहे.
सदर स्पर्धा ही अहिंसातीर्थावर आधारित स्पर्धा आहे. या मध्ये अहिंसातीर्थाला भेट देणाऱ्या सर्वांना स्पर्धेतील सर्व प्रश्नांची उत्तरे ही अहिंसातीर्थाच्या परिसरातील माध्यमातून व माहितीतून मिळतील. गोशाळेला भेट देणाऱ्यांना या परिसरात सर्व माहिती मिळेल. सदर माहिती घेऊन ते दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून प्रश्नपत्रिका सोडवू शकतील. या प्रश्नपत्रिकेंचे दोन भाग असतील पर्याय वाचक व दीर्घोत्तरी. सदर दोन्ही विभागांसाठी वेगवेगळी बक्षिसे देण्यात येणार आहे. प्रथम पुरस्काराला १ लाख रुपये, द्वितीय २५ हजार, तृतीय १५ हजार या बरोबरच १० हजार ते १ हजारांची विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे दीर्घोत्तरी उत्तरासाठी देखील ११ हजारापासून तर एकतीसशे रुपये अशी जवळ जवळ २ लाख १४ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अहिंसातीर्थ हे केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आता एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून उदयास आलेले आहे. अहिंसातीर्थाने आजवर अनेक लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविला आहे. आजवर लाखो लोकांना येथून अहिंसेची व शाकाहाराची प्रेरणा मिळालेली आहे. लाखो लोकांना करुणा, सेवा, सदाचार व सुखी जीवनाचा राजमार्ग या संस्कारांच्या गोशाळेतून मिळालेला आहे. अहिंसातीर्थ हे एकविसाव्या शतकात कलात्मकता, पर्यावरण आणि वास्तुशास्त्रातील सौंदर्य जपणारे प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. आज संपूर्ण भारत भरातून असंख्य पर्यटक, शाकाहार प्रेमी येथे येत असतात. भारतातील ही आगळीवेगळी गोशाळा आता नवं रूप घेऊन अधिक आकर्षक व प्रेरणादायी बनली आहे.
जास्तीतजास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन सुटीचा आनंद द्विगुणित करावा व सोबत लाखोंच्या बक्षिसांचे मानकरी व्हावे असे आवाहन अहिंसातिर्थातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९५५२२११०९९ किंवा ९५६१३२१०२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.