<
नाशिक-माळी समाज सेवा समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या महात्मा फुले विशेष पुरस्कार वितरण समारंभाच्या तयारी संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक शनिवारी दि.(०२) रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धा लॉन्स गणेशवाडी पंचवटी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे समाज दिनाचे आयोजन करण्यत आले शिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित व्यख्यान, माळी समाजाची दिनदर्शिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०१९ रोजी होणार असून यावेळी महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सहकारी, शैक्षणिक, औद्योगिक, नाट्य व सिनेक्षेत्रातील कलावंत , नाटककार , पत्रकारिता , वैद्यकीय व बांधकाम क्षेत्रांतील सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले विशेष पुरस्कार तसेच समाज भूषण, समाज रत्न पुरस्कार देऊन माळी समाज सेवा समितीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी आपण केलेल्या कार्याची माहिती आणि प्रस्ताव [email protected] या मेल आयडीवर किंवा ९७६६३५९२३३ या whatsapp नंबरवर दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ च्या आत पाठवावे असे आवाहन माळी समाज सेवा समितीच्या वतीने केले आहे. याबैठकीला माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,ज्येष्ठ समाज सेवक उत्तमराव तांबे, उपाध्यक्ष उत्तमराव बडदे , कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर , सरचिटणीस हरीश्चंद्र विधाते, शंतनू शिंदे , मयूर मोटकरी, वसंत पुंड, कैलास सैनी, प्रवीण जेजुरकर, महेश गायकवाड, सीताराम सोमासे , किशोर भास्कर, भास्कर जेजुरकर, संजय पुंड , रविंद्र माळी, दादा गायकवाड, सचिन दप्तरे, नरेंद्र ताजने, नंदकुमार येवलेकर, शंकरराव पुंड, रमेश गायकवाड, सुरेश गायकवाड, गिरीश बच्छाव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने बैठकीला उपस्थित होते.