<
चोपडा (प्रतिनिधी) – चहार्डी येथे दिनांक १३ जुलै २०१९ रोजी अवंता फाऊंडेशन चहार्डी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा येथील गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सध्याची जिल्हा परिषद शाळांची अवस्था पाहता अवंता फाउंडेशन ने जि.प. शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी व शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहू लागू नये म्हणून २०१८ पासून हा कार्यक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे.आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून चहार्डी गावातील आदर्श व्यक्तिमत्त्व मा.व्ही. एन. पाटील सर व प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.शाळा चहार्डी केंद्र प्रमुख मा.नरेंद्र सोनवणे (भाऊसाहेब) आम्हाला लाभले .ह्या कार्यक्रमाचे चहार्डी गावातील दान देणारे दाते श्रीमती. कोकिळा राहुल रामटेके ( कुर्ला) कु.कोनिका गोकुळ करंदीकर हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या मदतीने प्रत्येक गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले पाहिजे हा आमचा उद्देश आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मा.संभाजी पाटील सर प्राथमिक शिक्षक चहार्डी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले ,तसेच केंद्रशाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती सुशिला सपकाळे, उपशिक्षक हरिष शिंदे, कन्याशाळेच्या मुख्यध्यापिका मनिषा पाटील ,स्वाती पाटील ,शितल जाधव उपस्थित होते.ह्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोहर ढिवरे कार्यक्रम व्यवस्थापक संजय करंदीकर, कार्यक्रम समन्वयक स्वप्नाली करंदीकर, समाजकार्यकर्ता मा. आधार करंदीकर साहेब, रोहन ढिवरे यांनी परिश्रम घेतले.