<
जळगांव-(प्रतिनिधी):- शासकीय रुग्णालय हे आता शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले. अत्याधुनिक सेवा व सुविधा पुरविण्यासह सेवेत मनुष्यबळही शिकाऊ परिचारिका, डॉक्टर हे विद्यार्थी रुपात वाढले असून शासनाकडून सर्व सुविधा व नवीन इमारत उपलब्ध करूनही त्या मानाने या ठिकाणी वैद्यकीय सेवा सुविधा पुरवल्या जात नसल्याचे वृत्त आपण अनेक वृत्तपत्रात पाहिले आहेत. मात्र , गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी विविध ठिकाणावरून पक्षाघात, ब्रेनस्ट्रोक, या सह रोड अपघातात जखमी असलेले अथवा डोक्याला जबर मार लागून अत्यवस्थ असलेले रुग्ण येत असतात. रुग्णालयात दाखल होताच प्राथमिक उपचार केले जात असतात व पुढील गुंतागुंतीचा इलाज शहरातील खाजगी किंवा शहरातील बाहेरील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात करण्याचे सांगितले जात असते. असे चित्र पाहायला मिळाले आहे. मागील आठवड्यात जामनेर येथील रुग्ण रस्ते अपघातात जखमी असतांना त्यावर प्राथमिक उपचार करून काही तपासण्या ही करण्यात आल्या मात्र नंतर मेंदूवर मार लागल्याचे कारण सांगत पुढील उपचार येथे होणार नाही असे ड्युटी डॉक्टर, व परिचारिका कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे गोंधळात पडलेले रुग्णाचे नातेवाईक यांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधी शी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्याच बरोबर सि टी स्कॅन चा रिपोर्ट मिळाला असून त्याचाही फिल्म मात्र मिळत नसून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात ते मागत असलयाने त्रास सहन करावा लागत आहे. असे देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले तर शासकीय रुग्णालयात न्यूरॉसर्जन अथवा फिजिशियन उपलब्ध नसून त्या जागी खाजगी डॉक्टराना बोलावले जाते, त्याचे चार्जेस द्यावे लागतात, व सि टी स्कॅन ची रिपोर्ट उपलब्ध होत नसून ती फक्त रिपोर्ट दिले जात असल्याच संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे. एकी कडे शहरात वैद्यकीय सेवा सुविधा पूरक असाव्या म्हणून रुग्णालयाचे माहाविद्यालयात परिवर्तन होते तर दुसरीकडे रुग्णाना सेवा सुविधा देण्यात अडचणी निर्माण होत असल्याच चित्र आहे. यावरून शासकीय रुग्णालयाचे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न निर्माण होतो.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बि. एस. खैरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांच्याशी देखील संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यूरॉसर्जन व फिजिशियन बाबत अधिक माहीती मिळू शकली नाही.