<
जळगांव(प्रतिनीधी)- मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्त परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ” मला दिसलेली मराठी रंगभूमी” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याचा काळ आणि या काळात रंगभूमीच्या समोरील विविध प्रकारची आव्हाने असून याचा समाजातील विविध तज्ञांकडून रंगभूमी विषयक दृष्टीकोन व अपेक्षा यांचा शोध घेण्याचा परिवर्तनचा प्रयत्न आहे. यासंदर्भात जळगावातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यात श्री.एस एस राणे (प्राचार्य बेंडाळे महाविद्यालय) सुचिता हाडा (सभापती, स्थायी समिती) श्री. नंदलाल गादिया (गणित तज्ञ), डॉ रवी महाजन, (प्रसिद्ध शल्यविशारद), श्री अनिल कांकरिया(प्रसिद्ध उद्योजक), श्री. गनी मेमन(प्रसिद्ध उद्योजक), अंजली पाटील (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू) हे चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. चर्चासत्र उद्या सायंकाळी सहा वाजता महाविर क्लास, ख्वाजा मिया दर्गाच्या मागे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या चर्चासत्रासाठी कलावंतांनी लेखकांनी आणि प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तन च्या वतीने शंभू पाटील यांनी केले आहे.