<
जळगांव-(प्रतिनीधी)-निवडणूक संपली, कोणी कुणाची जिरवली, कोणी कुणाची मारली, कोणी कुणाला संपविले हे सर्व आता संपले असेल तर माझ्या खान्देश कडे पण जरा ढुंकून बघा साहेब, आज संपूर्ण महाराष्ट्रात आलेला ओला दुष्काळाने हाहाकार माजला आहे, माझा शेतकरी वाऱ्यावर आहे, इकडे सरकार स्थापनेचा सारीपाटेचा खेळ चालु आहे, पण ह्या सर्व गोष्टी वगळता काही नेत्यांचा ओला दुष्काळ पाहणी दौरा चालु आहे. मला फक्त सर्व राजकीय पक्षांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारायचे आहे की, तुम्हाला प्रचाराचा नारळ फोडायला, खान्देश दिसतो, खान्देशातील ३५ आमदार दिसतात मग खान्देशातील शेतकरी का दिसत नाही, प.महाराष्ट्राचा दौरा, कोकणचा दौरा, मराठवाडय़ाचा दौरा, विदर्भाचा दौरा, मग खान्देश काय पाकिस्तानात आहे का? खान्देशातील शेतकरींची अवस्था खुप बिकट आहे, ज्वारी सडली, बाजरी, मका सडला, कापूस गेला, अहो गुरांचा चारा सडला, खान्देशातील केळीचे पिक नेस्तनाबूत झाले, पण कोणताही राजकीय पक्षाचा मोठा नेता खान्देश मध्ये नाही आला. हो महाजनादेश दौराची सुरवात आणि सांगता खान्देश च्या माणसाच्या बोकांडी, जनआशिर्वाद दौरा खान्देश च्या बोकांडी, मग विकास किंवा मदतीबाबत खान्देश बायपास का? खान्देशातील नेत्यांनी आता तरी शिकावे, मा शरद पवार साहेब यांना महाराष्ट्रातील सर्व विभागातील नेत्यांनी सोडले, पण खान्देशातील नेत्यांनी निष्ठा दाखविली, आम्ही फक्त निष्ठा दाखवुन विष्ठा हुंगायची, बाकीच्यांनी मात्र निष्ठेवर विष्ठा फेकली तरी त्यांची दखल घेतली जाते, पण हे खान्देशातील तरुण कधी समजतील. आमच्यावर प्रत्येक बाबतीत अन्याय होतो, सत्तेचा वाटा पासुन ते विकासाच्या वाटे पर्यंत आम्हाला प्रत्येक पक्ष धत्तुरा दाखवितो. मोदी साहेब पासुन, ते पवार साहेब पासुन सर्वांनी खान्देश पासुन निवडणुक प्रचाराला सुरवात केली, पण आज दुष्काळी परिस्थितीत ह्या नेत्यांना खान्देश दिसत नाही, माझ्या तरुण मित्रांनो खरच आज जागे होण्याची वेळ आली आहे, खान्देश चा मागासलेले विकासाचे पर्व जर संपवायचे असेल तर आम्हाला स्वतंत्र खान्देशची मागणी करावीच लागेल, कारण मागुन मिळत नसेल हिसकावून घ्यावे लागते, आणि हिसकावून मिळत नसेल तर ताबा घ्यावा लागतो, ती वेळ आली आहे, कारण प्रत्येक बाबतीत अन्याय होतोय, पण आम्हाला चिळ येत नाही १)अजुनही खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही, २)वैधानिक विकास महामंडळ हे, कोकण, मराठवाडा, प महाराष्ट्र, विदर्भासाठी स्वतंत्र आहे, पण खान्देश उर्वरित मध्ये अस का?
४)महाराष्ट्राच्या जलसिंचन प्रकल्पाच्या प्रमाणात खान्देशात १० टक्के सुध्दा नाही, सहकार क्षेत्र संपलय, कंपन्या नाहीत, रोजगार नाहीत, नाशिक वगळता बाकी जिल्ह्य़ात एकही मल्टीस्पेशल सरकारी दवाखाना नाहीत, त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद मध्ये पेशंट न्यावे लागतात, बऱ्याचदा रस्त्यावर पेशंट दगावतात, तरीही आम्ही सहन करतो, आता वेळ आली आहे रस्त्यावर उतरण्याची प्रत्येक वेळेलाच खान्देश च्या विषयावर खान्देश हित संग्राम ही संघटना तुटून पडते, न्याय हक्कासाठी लढते, उद्या जर हि संघटना स्वतंत्र खान्देश करता रस्त्यावर आली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून प्रत्येक खान्देशी माणसाने पेटून उठायची वेळ आली आहे, शेतकऱ्यांना मदत करायला, त्यांच्या करता लढा द्यायला राजकीय पक्षासोबत, सामाजिक संस्था, साहित्यिक, पत्रकार, समाजिक क्षेत्रातील मान्यवर व बुध्दीजीवींनी सुद्धा विचार करायला हवा, कारण आता ऊंटावरुन शेळ्या हाकणे बंद झाले पाहिजे.
सुरेश पाटील- कल्याण
प्रवक्ता खान्देश हित संग्राम
९००४९३२६२६