<
जळगाव 5 :- ठेलारी या जमातीस महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमाती-‘ब’ अ.क्र.27 मधून महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमातीच्या अनुक्रमांक-29 धनगरची तत्सम भटक्या जमाती- ‘क’ मध्ये समावेश करणे संबंधिच्या प्राप्त निवेदनावर कोणाच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांच्या सुनावणीसाठी जनासुनावणीचे आयोजन केले आहे. ज्या संस्था, संघटना, व्यक्ती यांना काही निवेदन, हरकती व सूचना लेखी स्वरूपात मांडावयाच्या असतील त्यांनी आपली लेखी निवेदने, हरकती, सुचना बुधवार सकाळी 11 ते सायंकाळी 5.00 वाजेदरम्यान नविन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे येथे सादर करवीत. जनसुनावणी करीता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. भुषण कर्डीले, डॉ. राजाभाऊ करपे, श्री. डी.डी.देशमुख, सदस्य सचिव हे उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधितांनी याची नोंद घेवून आपल्या काही हरकती किंवा सुचना असल्यास त्या वेळेत सादर कराव्यात असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे डी. डी. देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.