<
पुरविण्यासाठी 5 डिसेंबर 2019 पर्यंत तहसिल कार्यालय,भडगावकडे निविदा सादर कराव्यात
जळगाव.दि. 5 :- भडगाव दुय्यम कारागृहाती 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी शिजवलेले तयार अन्न, पिण्यासाठी तसेच स्नानासाठी दिवसातून कमीत-कमी 2 वेळा पाणी पुरविण्याचा मक्ता द्यावयाचा आहे. इच्छूक मक्तेदारांनी चहा, न्याहरी खाद्यवस्तुंचे सिलबंद निविदा दि.5 डिसेंबर 2019 पर्यंत तहसिल कार्यालय,भडगाव येथे सादर कराव्यात.
कैद्यांना द्यावयाचे चहा, पिण्याचे व स्नानासाठी पाणी, खाद्यपदार्थ प्रमाण प्रति कैदी अनुक्रमे अश्याप्रकारे आहेत. 1) साखर -20 ग्रॅम 2) चहा पावडर-05 3) दुध-50 ग्रॅम 4) शिरा (रविवार व गुरूवारी) रवा-60 ग्रॅम 5) गुळ-40 ग्रॅम 6) वनस्पती तुप – 20 ग्रॅम 7) उपीट किंवा पोहे -60 ग्रॅम (मंगळवार व शुक्रवार) 8) रवा 60 ग्रॅम (सोमवार,बुधवार,शनिवार) 9) कांदे 10 ग्रॅम 10) गोडेतेल -05ग्रॅम 11) राई (मोहरी) 05 ग्रॅम 12) कोथिंबीर-01 ग्रॅम 13) हिरवी मिरची 02 ग्रॅम 14) हळद- 05 ग्रॅम 15) मीठ-02 ग्रॅम इंधनाकरीता 120 ग्रॅम लाकूड किंवा 25 मिली डिझेल 16) तांदुळ-150 ग्रॅम 17) गहु किंवा ज्वारी किंवा बाजरी किंवा पीठ (गहू पीठापासून बनविण्यात येणाऱ्या चपात्या किंवा ब्रेड याबाबत बंद्यांना विकल्याप्रमाणे देण्यात यावा) 300 ग्रॅम पीठ किंवा 500 ग्रॅम वजनाचा पाव 18) कडधान्य व डाळ 120 ग्रॅम रविवार सोडून 19) भाजीपाला तीन दिवस (सोमवार,बुधवार,शुक्रवार) 100 ग्रॅम, इतर-50 ग्रॅम, कंदमुळ 50 ग्रॅम, भाजीपाला चार दिवस (मंगळवार, गुरूवार, शनिवार, रविवार) 100 ग्रॅम, इतर- व कंदमुळ- 100 ग्रॅम 20) दुध किंवा दही 100 मिली 21) बेसन 30 ग्रॅम फक्त रविवारी 22) कांदे 50 ग्रॅम 23) टोमॅटो-100 ग्रॅम 24) गोडेतेल- 20 ग्रॅम 25) मीठ-10 ग्रॅम 26) केळी-1 नग (100 ग्रॅम) 27) ओला मसाला -5 ग्रॅम (हिरवी मिरची-2 आले 1.05, कोथमिर, 1 कढीपत्ता 0.5 ग्रॅम 28) सुका मसाला 220 ग्रॅम 29) जळण-680 ग्रॅम किवा 100 मिली डिझेल अशा प्रमाणात पुरवठा करावयाचा आहे. तरी जे मक्तेदार अटी आणि शर्तींची पुर्तता करू शकत असतील अशा मक्तेदारांनी दि. 5 डिसेंबर पर्यंत आपली सिलबंद निविदा तहसिल कार्यालय, भडगाव जि.जळगाव यांचेकडे सादर कराव्यात असे अधिक्षक दुय्यम कारागृह, भडगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकानवये कळविले आहे.