Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारातून परिवर्तनने साजरा केला रंगभूमी दिन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

परिवर्तन रंगभूमी दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

जळगांव(प्रतिनीधी)- जळगावची रंगभूमी सशक्त व जीवंत ठेवण्याची जबाबदारी कलावंतांसोबत रसिकांचीही जबाबदारी असून जळगावची रंगभूमी जीवंत आणि प्रवाही ठेवण्याचं कार्य परिवर्तन करत आहे म्हणून कलावंतांच्या व कलेच्या पाठीशी उभे राहणे ही प्रेक्षक व कलेविषयीची आस्था म्हणून आपली जबाबदारी आहे असं मत जळगावच्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने परिवर्तन तर्फे आयोजित चर्चासत्रात व्यक्त  केले. मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्त परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे ” मला दिसलेली मराठी रंगभूमी”  या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचा काळ आणि या काळात रंगभूमीच्या समोरील विविध प्रकारची आव्हाने असून याचा समाजातील विविध तज्ञांकडून रंगभूमी विषयक दृष्टीकोन व अपेक्षा या निमित्ताने मांडण्यात आला. या चर्चासत्रात प्राचार्य एस एस राणे यांनी पुर्वी अभिजनांची कला बहुजनांची झाली तरी ती सामान्य माणसांपर्यंत आज पोहोचत आहे का? तसेच सर्वसामान्य विषय घेऊन नाटक केले गेले पाहिजे आणि नाटकाला  अनुकूल असं पर्यावरण निर्माण करण्यासाठी शोध घेतला गेला पाहिजे. कलावंतांनी समाजाचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि वेगळ्या प्रकारचे नाटक रंगमंचावर आणावे जेणेकरून सर्वसामान्य माणूस हा कलेशी जोडला जाईल, हे विचार मांडले तर स्थायी समितीच्या सभापती अॅड. सुचिता हाडा आजकालच्या मुलांना अभ्यासात अनेक अडचणी निर्माण होतात या पाठीमागे भाषा हा प्रमुख विषय आहे कारण मराठीपण हरवत गेल्याने अनेक समस्या आज निर्माण होत आहे रंगभूमीची काळजी करत असताना मराठी भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे जर भाषा जगली तर रंगभूमी जगणार आहे.  कलेचे महत्त्व ओळखण्यासाठी मातृभाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसामान्य माणसाला कलेकडे वळवण्यासाठी आजच्या नवीन पिढीला भाषेचे उत्तम ज्ञान ही प्राथमिक गरज असली पाहिजे हा विचार जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती ॲडव्होकेट शुचिता हाडा यांनी मांडला. तर नंदलला गादिया यांनी नाटक अनेक गोष्टी आपल्यासमोर आणतं . परिवर्तनच्या माध्यमातून जळगावातील कला आणि सांस्कृतीक क्षेत्र हे विस्तारत आहे त्यामुळे मला अनेक नवीन चांगल्या गोष्टी पाहता आल्या,  शिकता आल्यात याचा आनंद आहे. उत्तम उपक्रम हे परिवर्तनच्या माध्यमातून होतात आणि ते जळगावची रंगभूमी सशक्त करत आहेत त्यामुळे मी अनुभवलेले नाटक हे परिवर्तनमुळेच आहे.  माझ्यातला रसिक हा परिवर्तनने समृद्ध केला आहे ,  हे विचार गादिया यांनी  मांडले. प्रसिद्ध शल्यविशारद डॉ रवी महाजन यांनी आपल्या पाल्याला त्याच्या आवडीचे क्षेत्र निवडून दिले पाहिजे, कलावंत म्हणून नाट्यगृहात होणारे प्रयोग जर वाढीला लागले तर कलेला उत्तम दिवस येऊ शकतात. बदलत्या माध्यमांमुळे यावर उपाय म्हणून वेगवेगळे वेगवेगळी माध्यमं कलावंतांनी आणि परिवर्तन सारख्या संस्थांनी पुढाकार घे घेत रसिकांना जोडण्याचं काम केलं आहे त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात असून सुद्धा माझ्यातला रसिक हा जिवंत आहे हे परिवर्तन संस्थेच्या विविध सांस्कृतिक उपक्रमानेमुळे समृद्ध होणारी गोष्ट आहे. प्रसिद्ध उद्योजक अनिल कांकरिया यांनी रंगभूमी समाजाचा आरसा समाजाला सुसंस्कृत करणार हे माध्यम आहे पण या माध्यमाला व्यवस्थापनाचं व्यवस्थापनाची जोड मिळाली तर जळगावची रंगभूमी ही बलशाली होऊ शकते आणि मी आणि माझी संस्था परिवर्तन सारख्या संस्थेच्या विविध उपक्रमांच्या पाठीशी उभे राहू असं मत अनिल कांकरिया यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी नवीन पिढी नाटकाकडे वळले पाहिजे तसेच मुलांना नाटकाची गोडी लागावी यासाठी आपण सर्व मिळून काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध उद्योजक गनी मेमन त्यांनी रंगभूमी माणसाचं दुःख हलकं करायला मदत करते खरेच समाजसेवक हे रंगभूमीवरील कलाकार आहेत जळगाव शहरात नाटक साहित्य यामाध्यमातून परिवर्तने कलेचे क्षेत्र जिवंत ठेवले समाजापर्यंत त् पोहोचण्यासाठी आणि समाज प्रबोधनासाठी कला हे महत्त्वाचं माध्यम आहे आणि या माध्यमाच्या विकासासाठी परिवर्तन संस्थेच्या पाठीशी आम्ही सर्व उभे राहू अशी ग्वाही रंगभूमी दिनाच्या निमित्ताने गनी मेमन यांनी दिली. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील  यांनी रंगभूमी म्हणजे सगळ्या कलांचा समुच्चय असून शालेय स्तरावर मी नाटकांमध्ये काम केलं पण क्रीडा क्षेत्रात यश मिळवल्यानंतर जेव्हा मी नाट्यक्षेत्रात कडे वळून बघते तेव्हा माझ्यातला खेळाडू विकसित करण्यासाठी एक शक्ती म्हणून मला नाट्य क्षेत्राची खूप मदत झाली आज माझी पुढची पिढी हे चित्र आणि नाटक या क्षेत्राकडे वळू पाहते ते बनवण्यासाठी मी स्वतः घरातून सुरुवात केली असंच म्हणू या की मी माझ्या मुलीचं नाव बोट धरून आज या रंगभूमीवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करते या पाठीमागे परिवर्तन आहे  हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल ॲड. सुचिता हाडा यांचा सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नाट्य कलावंत शंभू पाटील, पियुष रावळ, होरिलसिंग राजपूत, सुदिप्ता सरकार,  प्रा. राजेंद्र देशमुख, विनोद रापतवार, नारायण बाविस्कर यांनी चर्चेत सहभाग घेतला तर कार्यक्रमाला निंबाळकर राहूल निंबाळकर, शितल पाटील, राजू बाविस्कर, हर्षदा पाटील, हेमंत काळुंखे, विनोद पाटील, किशोर पवार आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

कलावंतांनीच नाही तर प्रत्येकानेच वैचारिक भूमिका घेतली पाहिजे मराठी रंगभूमी दिनी अ.भा. मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे प्रतिपादन

Next Post

खान्देशातील नाट्यचळवळीला पुन्हा संजीवनी मिळेल का?

Next Post
खान्देशातील नाट्यचळवळीला पुन्हा संजीवनी मिळेल का?

खान्देशातील नाट्यचळवळीला पुन्हा संजीवनी मिळेल का?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications