<
जळगांव(प्रतिनीधी)- आज मराठी रंगभूमी दिवसाच्या निमित्ताने माझ्या सर्व रंगकर्मी कलाकार व व्यवसायीकांना हार्दीक शुभेच्छा! मराठी रंग भूमी ने अनेक दिग्गज कलाकार दिले, व त्याच्यात खान्देश चा खुप मोठा सहभाग आहे, महाराष्ट्रात खर तर एक काळ असा होता की, खान्देश व कोकणात गल्लोगल्ली नाटके होत, खान्देशात तर गावागावात नाट्यमंडळ होती, खुप चांगले अभिनय ही सादर होत, खान्देश मध्ये नाटक, तमाशा ह्या गोष्टींना सुगीचे दिवस होते, कारण सर्वोत्तम कलाकार खान्देश मध्ये होते, महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा मंडळाची पेढी ही अमळनेर होती, कालांतराने लोप पावत नारायणगाव ला गेली. तसेच नाट्य चळवळ होती, पण आम्ही खरच ती जोपासली नाही, त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे स्थलांतर पण आहे, रोजगार नसल्यामुळे तरुण शहराकडे वळले, परंतु कोकणातील तरुणांनी व रसिकांनी ही चळवळ दिवंगत केली, मोजक्या लोकांची मालवणी भाषा सातासमुद्रापार गेली, त्याला कारण म्हणजे त्यांचे त्यांच्या संस्कृतीवर प्रेम भाषेवर प्रेम म्हणून ती जिवंत आहे, आजही कोकणी माणूस पदरमोड खर्चाने नाटकाचे तिकीट काढून नाटक बघायला जातात, त्यांच्या कार्यशाळा आहेत, कलाकारांना नवोदित कलाकारांची जाण आहे.आज आमच्याकडे जळगाव मध्ये एक हजार प्रेक्षक गृहाचे नाट्यगृह आहे, मला वाटत भारतातील सर्वात मोठे नाट्यगृह आहे, अमळनेर येथे भव्यदिव्य आधुनिक नाट्यगृह आहे, धुळे येथे खुप मोठे स्व लोकनेते भाऊसाहेब हिरे नाट्यगृह आहे, नंदुरबारला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आदयावत आहे. पण नाटक नाहीत, कलाकार नाहीत, हे सर्व नाट्यगृह राजकीय पक्षांचे आखाडे व विवाह मंगलकार्ये बनले आहेत, खर तर काळाची गरज आहे नाट्यचळवळ उभी राहण्याची, जे नामांकित कलाकार असतील, दिग्दर्शक असतील किंवा ज्यांना कला जोपासण्याचा छंद असेल त्यांनी पुढाकार घ्यायला हरकत नाही. मागील काही काळात लघुपट व गाण्यांच्या सिडींनी खान्देशात धुमाकूळ घातला होता, खुप चांगले कलाकार तयार होत होते, पोट खाली ठेवून कोणतीच गोष्ट शक्य नाही, म्हणून अनेक चांगले कलाकार उद्यास येवु शकले नाहीत, व जे चांगले गायक होते त्यांची अशी अवस्था आहे की, ते अंत्ययात्रेत गाणी गातात, हे सर्व पुन्हा चालु झाले पाहिजे पुन्हा बी कुमार राजवडकर जन्माला यायला हवे, उत्तम नाच्या, पंडीत नाच्या, जन्माला यायला हवेत, मा विश्राम (आप्पासाहेब) बिरारी, मा इश्र्वर माळी आणि इतर सर्व कलाकार ज्यांनी खुप मोठे योगदान दिले आहे, ते सर्व ह्या चळवळीत चिरतारूण्यात यायला हवे, हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आणि सर्व रंगकर्मी कलाकारांचे पुन्हा हार्दीक अभिनंदन करतो.
सुरेश पाटील प्रवक्ता खान्देश हित संग्राम ९००४९३२६२६