<
जळगांव(धर्मेश पालवे):- महाराष्ट्रात ओला दुष्काळ असतांना विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करून मोबदला देऊन धीर देण्याचं ही जाहीर केलं आहे , त्या अनुषंगाने पंचनामे सुरू असून आता मुक्या जनावरांचे काय असा प्रश्न पडत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने ज्वारी व मका पिकांचे नुकसान झाले आहे. अति पावसाने चारा कुजला असल्याने जनावरांच्या चाऱ्याची आगामी काळात टंचाई होऊ शकते ती हाऊ नये, यासाठी पशुसवर्धन विभागाने जिल्ह्यात चारा टंचाई साठी प्रयत्न करावे आणि जिल्ह्यातील ओल्या दुष्काळात उद्भवणाऱ्या समस्येच निरसन करावे असा सुर आता शेतकरी बांधवांसह जनतेत आहे. जिल्हयातील सर्व गावात झालेल्या अतिवृष्टीत मका ज्वारी बाजरी पिकांचा चारा खराब झाला आहे. शेतकऱ्यांसह पशुपालकही हैराण झाले आहे. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चारा टंचाईच्या विळख्यापासून सुटका करण्यासाठी वेळीच उपाय योजना आखल्या पाहिजे , अन्यथा शेतकरी व पशुपालक यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल .