<
जळगांव(धर्मेश पालवे):-जळगांव जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालुक्यातील व या मधील सर्वच गावातील बहुतेक सर्वच भागातील शेताचे नुकसान या परतीच्या पावसाने झाले आहे. मागच्या वर्षी दुष्काळ होता, यंदा कांदा बाजरी, मका, कापूस, सियाबीन आदी पिके हाताला आलेली असतांना परतीच्या पावसाने तोंडचा घास पळवला आहे. पावसाने दिवाळीत दिवाळ काढलं, उभ धान्य आडवं झालं, कडप्याले अंकुर आणि पीक माती मोल झालं आहे. परतीच्या पावसाने धान पीक मातीमोल केलं आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाती फुटकी कवडी ही येण्याची आशा नाही. जमिनीवर पडलेल्या धान्याला अंकुर फुटले, कापूस माती मोल झाला आहे. बाजारात काळ्या धान्याला कोणतीही किंमत येणार नाही. त्यामुळे सर्व हंगाम आता शेतकऱयांच्या हातून गेलेला आहे असे चित्र आहे. शासनाचे कर्मचारी व विविध राजकीय पुढारी शेताच्या बांधावर येत आहेत, शेतकऱ्यांना धीर देत आहेत परंतु नेमकी मदत केव्हा मिळेल हे कुणीही सांगत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याच दिसत आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसोबतच व्यापारचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अश्या परिस्थिती सरकारने काही हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारची आवश्यकता आहे. यासाठी भाजप व सेनेनं यातून सावरण्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकऱयांना नियम व अटी शर्थी चा घोळ न घालता मदत देणे गरजेचे आहे असे सत्यमेव जयतेच्या नजरेस आले आहे आहे.