<
जळगाव – जिल्ह्यातील अनुदानीत तसेच विना अनुदानित महाविद्यालयांतील भारत सरकार शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण फी परिक्षा योजना व इतर योजनांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षाकरिता महाडिबीटी पोर्टलवर अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाचे विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण फी परिक्षा योजना व इतर योजनांचे अर्ज करण्यास 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत वाढ करून आता 15 नोव्हेंबर, 2019 अशी करण्यात आली आहे. या मुदतवाढीचा सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी वाढीव मुदतीची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव श्री. योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.