<
नाशिक (विमाका)-विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आले आहे.
तरी ज्या समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त सुरेखा पाटील यांनी कळविले आहे.