<
जळगाव- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्य शासनाच्या 26 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार धाडसी क्रीडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्किईग, स्नोबोडींग, पॅरासेलींग, हॅग्लायडींग, पॅराग्लायडींग, जलक्रीडा (वाटरस्पोर्टस) इत्यादिंच्या मोहिमा , कॅम्प , खेळ, स्पर्धा आयोजित करणाऱ्या सर्व संस्थांनी / व्यक्तींची शासनाकडे नोंदणी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर समितीमार्फत जिल्ह्यातील धाडसी क्रीडा प्रकारात कार्यरत व्यक्ती तसेच संस्था यांची कागदपत्रे तपासणी व नोदणी प्रमाणपत्र देण्यासाठी देण्यात येणार आहे. अशा व्यक्ती/संस्था यांची कामदपत्रे देण्यासाठी जमिनीवरील,पाण्यातील व हवेतील धाडसी क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 2 तज्ञ व्यक्ती अशा एकूण 6 व्यक्तींची समिती मध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. समितीमध्ये नामनिर्देशीत सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील तज्ञ व्यक्तींची किंवा ज्यांनी या धाडसी प्रकारातील मान्यताप्राप्त संस्थांमधील अभ्यासक्रम पुर्ण केला आहे अशा व्यक्तींनी 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव यांचेकडे अर्ज व कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी , जळगाव मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.