<
खेळाडूंसोबत प्रा. निलेश जोशी, श्री. प्रविण पाटील व अक्षय सोनवणे
जळगांव(प्रतिनीधी)- के. सी. ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमीमध्ये सराव करणार्या ०३ खेळाडूंनी सी.बी.एस.ई. क्लस्टर ९ या संघात स्थान मिळवले असून ते समता इंटरनॅशनल स्कूल, कोपरगाव, महाराष्ट्र येथे होणार्या सी. बी. एस. ई. एरोबिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. १० नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान या स्पर्धा ११, १४ व १९ वर्षे वयोगटात होणार आहेत. या स्पर्धेत एकलव्य जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमीचा संघ ११ वर्षे वयोगट व १४ वर्षे वयोगट या दोन गटात सहभागी होणार आहे. या संघामध्ये खालील खेळाडूंची निवड झालेली आहे. ११ वर्षे वयोगट (मुली): साची इंगळे, अनुष्का चौधरी १४ वर्षे वयोगट (मुले): उत्कर्ष सोनार या खेळाडूंना एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी व प्रा. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, राज्य जिम्नॅस्टिक्स संघटना उपाध्यक्ष श्री. प्रविण पाटील, अक्षय सोनवणे यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.