<
विहीर अधिग्रहण करून गावासाठी वापरले पाणी, मोबदला मात्र दिलाच नाही;ग्रामसेवकाचा हलगर्जीपणा
मुक्ताई-नगर(विनोद चव्हाण):- येथील मोरझिरा गावात या वर्षी मार्च महिन्यात भर उन्हाळ्यात गावात पायला पाणी नव्हते, पाण्याचा दुष्काळ होता. म्हणुन गावाची तहान भागवीन्यासाठी ग्राम पंचायतीने गावातील पाण्याची विहीर अधिग्रहित करून त्या द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी येथील शेतकरी नामदेव भंगी राठोड यांची विहीर अधिग्रहित केली. व तशा प्रकारचे कागदोपत्री पूर्तता देखील केली. अधिग्रहित विहीरीतुन मार्च २०१९ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत सलग चार महिने गावातील जनतेची तहान भागवन्यात आली. मात्र सदर ग्राम पंचायतने शेतकरी नामदेव भंगी राठोड यांना ठरल्या प्रमाणे ४ महिन्याचा मोबदला न देता फक्त जून महिन्याचाच २७ दिवसांचा मोबदला दिला असल्याची बाब समोर आली आहे. शेतकरी नामदेव भंगी राठोड यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवकाने हलगर्जी पणा करत दप्तर न भरता आळशी पणा केला आहे. आणि त्यांनी दाखवलेल्या कागदोपत्री असणाऱ्या पुराव्यानुसार, ग्राम पंचायतिने प्रतिमहिना १८,००० रुपये मोबदला देणे अपेक्षित असतांना एकाच महिन्याचा मोबदला देऊन अन्याय केला आहे. शेतकरी नामदेव भंगी राठोड आपल्या मोबदल्याची वेळोवेळी चौकशी केली असता संबंधित विभागाकडून हाकलून लावले गेल्याच ते सांगत आहेत. ग्रामसेवक भिवसेने यांनी उडवा उडविचे उत्तर देत, शेतकरी राठोड यांची फसवणूक केल्याचं उघड झाले आहे. आधीच पाण्याअभावी गावकर्यांची तहान भागवली, एन दुष्काळात मुबलक पाणी असूनही पीक न घेता मदत केली, आणि आज ओल्या दुष्काळात होत्याच नव्हतं झालं त्या मुळे दोन्ही परिस्थिशी सामना करत असता शेतकरी राठोड यांची फसवणूक करून ग्रामसेवक, सरपंच, आणि संबंधित अधिकारी यांनी पैशे लाटले आहेत. या प्रकाराला शासन किती गांभीर्याने घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ग्रामासेवकाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर सरपंच साहेबांना फोन लावला असता त्याचांही संपर्क होऊ शकला नाही. या प्रकारामुळे शेतकरी नामदेव राठोड मात्र हवालदिल झाले आहेत. तसेच त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकठे न्याय मिळण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल दखल घेऊन न्याय मिळेल अशी आशा देखील त्यांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधी शी बोलतांना व्यक्त केली आहे.