<
जळगांव-(धर्मेश पालवे)-संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला, आणि प्रसंगी ओला दुष्काळाचं सावट शेतकऱ्यांवर उभं झालं. कधी दुष्काळ तर कधी गारपीट ने कोरडवाहू शेतकऱ्यांची होणारी विपन्नवस्था सरकार दरबारी निव्वळ सहानुभूतीचा विषय आहे. एकीकडे सरकार शेतकरीचे उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा होते, घोषणांचा पाऊस होतो, भाषणात या मुद्याचा सुकाळ होतो.मात्र शेतकऱ्याच्या पदरी व्यथा कायम असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात ओल्या दुष्काळ परिस्थिती आढावा, पंचनामा, आणि नोंद करण्यात आली असे सांगण्यात आले. मात्र, अजूनही काही ठिकाणी पंचनामा करण्यात दिरंगाई होत अशक्यच समोर आलं आहे. कोरडवाहू, अल्पभूधारक, आणि बागायतदार असे सर्व प्रकारात मोडणारे शेतकरी यंदा कोलमडले आहेत. त्याच बरोबर बागायत दार, ऊस उत्पादक,फळ बागा पीक घेणारे शेतकरीची तीच अवस्था आहे, आणि हे सर्व सरकारी धोरणांचे बळी ठरतील असे म्हणणे वावगे ठरू नये. कारण, महाराष्ट्र मधील ओला दुष्काळ पाहता शासनाने जाहीर केल्या प्रमाणे पंचनामे केले जात असताना जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवला येथील एका शेतकऱ्याला लाच मागणे, आणि मुक्ताई नगर तालुक्यातील मोरझिरा या गावच्या शेतकऱ्याची फसवणूक करणे असे दोन्ही गुन्हे हे शासन दरबारी असणाऱ्या सेवकांनीच केले आहेत. हतबल व हवालदिल शेतकरीची ही अवस्था व त्यात त्याची अशी पिकवणूक पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यां बाबत येथील प्रशासन व अधिकारी वर्गाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात, आणि जिल्ह्यातील ओला दुष्काळात शेतकरी विकासाचा मुद्दा शासनाच्या लाभाच्या चौकटीत कितपत टिकणार हा प्रश्न ही उभा राहतो. शेतकऱ्यांबद्दल पदोपदी सहानुभूती व्यक्त होते, मात्र पत निर्माण करण्यासाठी कोणीही साथ देत नाही. अश्या वेळी येथील जनतेचे प्रतिनिधी ही हातावर घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेताना दिसतात,म्हणून शेतकरी विकास हा बोलाचा भात आन बोलाचीच कढी असे म्हणणे वावगे ठरू नये.