जळगांव-(प्रतिनिधी)-आखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने जळगांव येथील स्वातीताई अजय बाविस्कर यांची आखिल भारतीय कोळी समाज महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सदर निवड ही आखिल भारतीय कोळीसमाजाचे युवा प्रदेश अध्यक्ष परेश कोळी व प्रदेश कार्यध्यक्ष संजय शिरसाठ यांनी केली, असून संपूर्ण खान्देश व राज्यात गाव तिथे युवा महिला शाखा स्थापन करून महिला संघटन वाढवल्या कामी तसेच समाज जागृती संघटन निर्माण करण्याच्या दृष्टीने निवड करण्यात आली. सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून स्वातीताई यांना प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने शुभेच्या देण्यात आल्या आहेत.