चाळीसगाव(प्रतिनीधी)- मेहुणबारे ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक मोरे यांनी ग्रामसेवक यांना माहिती अधिकाराचा अर्ज दिला असता सरपंच यांचे बंधू महेंद्र नरेंद्र चव्हाण यांनी तो अर्ज हिसकावून घेतला, तुम्ही कोण आहात आमच्याकडे अर्ज वैगरे काहीच चालत नाही तुम्ही इथून चालते व्हा अशी शिवराळ भाषा त्यांनी वापरली. हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळेस ग्रा.प. सदस्य अशोक त्र्यंबक वाघ, तसेच संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील हे देखील हजर होते, व त्यांनी देखिल सरपंचाचे बंधू यांना समजावण्याचा प्रयत्न केला पंरतु त्यांनी त्यांच्या बोलण्यात ते स्वतः सरपंच आहेत असे सांगितले. ते ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत पण हुकुमशाही पद्धतीने ते इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी वागतात. त्यानंतर दिपक मोरे यांंनी रात्री सात वाजता पोलिस स्टेशन मेहुणबारे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पुढील कारवाई साठी दिपक मोरे हे गटविकास अधिकारी यांना भेट देऊन निवेदन देणार आहेत.