जोपर्यंत माणसामाणसात संवाद सुरू असेल तोपर्यंत रंगभूमी जिवंत राहील – संदिप पाठक
जळगांव(प्रतिनीधी)- आजच्या काळात रंगभूमीचा चहूबाजूंनी विचार व्हायला हवा. रंगभूमी ही संवादाचं महत्त्वाचं माध्यम आहे. कितीही काळ बदलला तरी रंगभूमी कधीच मरणार नाही. जोपर्यंत माणसामाणसात संवाद सुरू असेल तोपर्यंत रंगभूमी जिवंत राहील, प्रत्येक माध्यमाचे चढ-उतार असतात तसेच रंगभूमी बाबत ही चढ-उतार आहेतच. ज्या पद्धतीने जत्रेमध्ये आकाशपाळणा असतो तशीच अवस्था आजच्या काळात रंगभूमीची आहे. त्याला कारण म्हणजे समाज माध्यमांची मोठ्या प्रमाणावर वाढलेली संख्या आहे. कारण टीव्हीमुळे माणूस हा आळशी बनतो आहे. विचार करायला लावणारे कार्यक्रम आज दूरदर्शनवर फारसे दिसत नाहीत, त्यामुळे सासु सुनेच्या भांडणापलीकडे विश्व आहे याचा विसर पडत चाललेला आपल्याला दिसून येईल. इंटरनेट, यूट्यूब, व्हाट्सअप ही माध्यम आलीत आपण त्यात रममाण झालो, म्हणजे मोबाईलने बोलणं वाढलं, संवाद वाढला पण व्हाट्सअप आलं आणि बोलणं कमी झालं, चॅटिंग वाटलं या माध्यमाचा मोठा परिणाम रंगभूमीवर झाल्याचा आपल्याला जाणवतो आहे. कारण हातात मनोरंजनाची साधने झाली आणि तुम्ही – आम्ही शिक्षण घेऊनही अंगठेबहाद्दर झालोत पण असं काही असलं तरी अजूनही मराठी रंगभूमी ही सशक्त होत चालली आहे छोटी छोटी नाटके निर्माण करत माणसं आवडीने ती बघू लागली आहेत याचं कारण एकाच वेळी मुंबई सोबत , पुण्यासोबत महाराष्ट्रातल्या खेड्यातही नाटकं होत आहेत म्हणूनच वाढत्या माध्यमांच्या या काळात रंगभूमीची अस्तित्व हे खडतर असलं तरी हा काळ रंगभूमी हाताळू शकते उत्तम नाटकं आणि चांगली कलावंत यांच्या बळावर रंगभूमी ची वाटचाल प्रगतीच्या दिशेने जाईल असा मला विश्वास आहे असं मत प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांनी व्यक्त केलं परिवर्तन आयोजित “माध्यमांच्या गर्दीत रंगभूमीची अस्तित्व” या विषयावरील व्याख्यानमालेत अभिनेते संदीप पाठक बोलत होते. रंगभूमीशी नाळ टिकवून ठेवण्यासाठी कलावंत म्हणून मी परिवर्तनाच्या उपक्रमात हक्काने सहभागी होईल. नवीन रंगकर्मीनी आपली भाषा जपून ठेवावी, तसेच इतरही भाषा आत्मसात कराव्यात. असे आवाहन केले. याप्रसंगी रंगकर्मी होरीलसिंग राजपूत, वसंत गायकवाड, प्रा. पी आर सपकाळे, गायिका सुदिप्ता सरकार, रंगकर्मी मंजुषा भिडे, रंगकर्मी शंभू पाटील , मंगेश कुलकर्णी, कुणाल चौधरी, अक्षय नेहे, हर्षदा कोल्हटकर आदी उपस्थित होते.