<
पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक संतोष पाटील गोराडखेडेकर यांना मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक सखा फाउंडेशन यांच्या वतीने देशातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया व्यक्तींचा सत्कार करण्यात आला . महाराष्ट्रातून संतोष पाटील यांची सत्कारमूर्ती म्हणून निवड करण्यात आली .संतोष पाटील सर हे गोराडखेडा तालुका पाचोरा येथील रहिवाशी असून ते व्यवसायाने शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . ते महापुरुषांच्या जीवनावर व्याख्यान देत असतात व आपल्या व्याख्यानाचे मानधन ते अनाथालय व वृद्धाश्रमांना देत असतात .महापुरुषांचे विचार खेड्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्ये करतात . त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
भोपाळ मध्यप्रदेश येथील हॉटेल फॉर्च्युनर गार्डन येथे हा भव्य व दिव्य समारंभ झाला .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेते जावेद खान हे उपस्थित होते .त्याच बरोबर सोनू शर्मा डोरेमॉन व्हाइस फेम या सुद्धा उपस्थित होत्या .राहुल राजपूत , शुभम चौरसिया हा तर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नॅशनल ग्लोबल अचिव्हर्स हा पुरस्कार देण्यात आला . या आदि त्यांना एक राष्ट्रीय व आठ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .