<
मुंबई-(विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी गेले पंधरा ते सोळा वर्षापासून राज्यभरात पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी ट्रिबल लढा उभारला होता. आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आला होता. या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागर राव यांनी घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व नेते व आघाडीतील सर्व आजी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने विविध मागण्यांचे निवेदन सादर करून, हा पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अंमलात यावा अशी मागणी केलेली होती.
डॉक्टरांना कायदा होऊ शकतो तर, पत्रकारांना कायदा का होऊ शकत नाही. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष राजमाने, माजी अध्यक्ष गोविंद घोळवे, कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्यासह राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, यासाठी पंधरा ते सोळा वर्षापासून या मागणीसाठी लढा उभारला होता. अखेर या कार्याला यश आले असून पत्रकार संरक्षण कायदा तातडीने करण्यात यावा. यासाठी राष्ट्रपतींनी राज्य सरकारला या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये पत्रकार संघाच्या लढ्याला यश आले आहे. राज्यातील सर्व प्रमुख पत्रकारांच्या संघटनांनी यामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यभरातील पत्रकारांसाठी अधिवेशनही मिळावे. मोर्चे घेऊन हा लढा तीव्र करण्यासाठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने सरकारला हा कायदा करण्यास भाग पाडले. त्यामुळे राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे राज्य पत्रकार संघाने अभिनंदन केले जात आहे. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांचे पत्र घेऊन, हा संरक्षण कायदा किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. “पत्रकार संरक्षण कायदा ही काळाची गरज असून यासाठी सर्वांनी एकत्रित यावे” ही हाक राज्य पत्रकार संघाने दिली होती. राज्य पत्रकार संघाने वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच राज्यभरातील सर्व पत्रकारांनी साथ दिल्यामुळे हा संरक्षण कायदा झाला. नक्कीच लेखणीला दाद मिळाली असून निर्मिती पत्रकारितेला या कायद्यामुळे उजाळा मिळाला असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी हा पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अंमलात आणला जाईल. अशी ग्वाही दिली गेली होती तर, राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी देखील पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अंमलात यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील दोन वर्षांपूर्वी पत्रकार संरक्षण कायदा दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाला होता व या कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य पत्रकार संघाने राज्यातील सर्व अधिवेशनामध्ये एकमुखी मागणी केलेली होती. या मागणीला अखेर कालच्या राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने लवकरच पत्रकार संरक्षण कायदा लागू होईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या २१ मागण्यांपैकी तीन मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सदैव पत्रकारांच्या सेवेसाठी बांधील राहील असे आश्वासन यावेळी राज्य संघटक संजय भोकरे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी दिले आहे.