<
विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे- सौ वसाने
जळगांव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर शिव कॉलनी जळगाव येथे १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वसाणे यांनी माल्यार्पण केले. बालदिनाच्या निमित्ताने इयत्ता १ ते ४ वर्गाचे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात १ ली ची विद्यार्थिनी सोनाक्षी चौधरी, २री चा विद्यार्थी दर्शन चौधरी, ३री चा विद्यार्थी सोहम पावरा, तर ४थी च विद्यार्थी गणेश ठाकरे हे प्रथम आले. क्रीडा स्पर्धा मध्ये प्रथम आलेल्या लहान बालकांना मुख्याध्यापिका सौ वसाने यांनी बक्षीस म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पंडित नेहरूं बद्दल इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. तसेच नेहरू यांच्या कार्यबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमास प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांचे लाभले. उपक्रमाचे आयोजन नियोजन सौ अडकमोल व ठाकरे यांनी केले तर सहकार्य सौ भारंबे, ब्राम्हणकर, व सुदर्शन पाटील यांचे लाभले.