<
अभिनव पद्धतीने बालसभे द्वारा झाला आदिवासी भिल्ल वस्तीत बालदिन साजरा
एरंडोल(प्रतिनीधी)- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतभर आज बाल दिन साजरा होत असून बालकांच्या दृष्टीने चांगले निर्णय होऊन त्यांचे उज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जि.प.प्राथमिक शाळा गालापूर ता. एरंडोल येथे आयोजित बालदिनानिमित्त ची बाल सभेला संबोधित करताना राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी केले. बालदिनानिमित्त बालसभा घेऊन बालकांच्या आवडी-निवडी व अपेक्षा विचारण्यात आले. बालदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाद्वारे आदिवासी वस्तीवरील बालके बोलती झाली. बाल सभेचे अध्यक्ष इयत्ता २री शिवनेर भील म्हणाला की आम्हाला खूप खूप खेळण्यात मजा येते. यावेळी दुर्गा भिल १ली ने देखील शाळा खूप आवडते असे म्हटले. आरती भील, खेलती बारेला, आदींनी बालदिनानिमित्त पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती दिली. लहान मुलं निसर्गाच्या सान्निध्यात खूप काही शिकतात प्रसंगी त्यांच्याकडून आम्हालाही शिकायला मिळते असे यावेळी शिक्षक या नात्याने किशोर पाटील कुंझरकर म्हणाले. मोबाईलचे जाळ्यात मुलांनी अडकू नये . तसेच वेगवेगळ्या बोलीभाषेतील ज्ञानाचा ठेवा सर्वांना कळावा म्हणून शासनाने एक बालशिक्षणाचे स्वतंत्र वेबसाईट तयार करावी व बालकांना या जगात ज्ञान समृद्ध करता यावे असे मत यावेळी बोलतांना कुंझरकर यांनी मांडल. बालसभा घेण्यामागे उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की लहान बालके उद्याचे या देशाचे उज्ज्वल भविष्य असून त्यांचे सुरक्षित व दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सुरेश भिल, सखाराम भिल, सुभाष भील, सीमा सोनवणे, रेखा भील, नरेश बागूल आदी उपस्थित होते.