<
खारी बिस्किट चित्रपट पाहून साजरा केला बालदिन
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सुर्या फाऊंडेशन पाळधी संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतो. त्याच्याच एक भाग म्हणून शाळेचे अध्यक्ष अर्चना सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तसेच शाळेच्या मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यातच हा बालदिन शाळेने एका अनोख्या पद्धतीने म्हणजेच विद्यार्थ्यांना जळगांवातील खान्देश सेंट्रल माँल येथील आयनाँक्स या चित्रपटगृहात खारी बिस्किट हा चित्रपट दाखवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी सर यांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्यावर माहिती देण्यात आली. यानंतर मुलांना शाळेच्या बसेस द्वारे जळगांवात येऊन आयनाँक्स या चित्रपटगृहात खारी बिस्किट चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या अध्यक्षा अर्चना सुर्यवंशी, मुख्याध्यापक योगेश करंदीकर, आयनाँक्स चित्रपट गृहाचे व्यवस्थापक, गुणवंत पवार, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य लाभले.