<
भुसावळ(प्रतिनीधी)- डेंग्युसह सदृश्य आजारामुळे चार जणांचा बळी गेल्यानंतरही पालिका प्रशासनाने उपायांना गती दिलेली नाही. शहर विविध समस्यांनी ग्रासले आहेत. नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता आज दि.१४ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या अनास्थेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनाधार विकास पार्टीच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासुन आक्रोश मोर्चा प्रांत कार्यालय व नगरपरिषदेवर काढण्यात आला.रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन करण्यात यावे, त्यांना मुलभुत सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे प्रशासनाने डॉ. आंबेडकर मार्गाच्या बाजुला असलेली दुकाने विना परवानगी काढून टाकुन न.पा.च्या मालकीच्या रस्त्यास वापरण्यास अडथळा निर्माण केल्यास रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करुन हा रस्ता जनतेसाठी पुन्हा खुला करावा, रस्त्याच्या कडेस दुकाने उभारुन बेरोजगारांना रोजगारासाठी पर्याय निर्माण करावा,शहरातील नाले व गटारींची स्वच्छता व कच-याची विल्हेवाट होत नसल्याने डेंग्यु सारख्या आजाराने थैमान माजवले आहे. यात ४ रुग्ण डेंग्युच्या आजाराने मृत्यु मुखी पडलेले आहे. त्यांच्या वारसांना १० लाखाची मदत मिळावी. दवाखान्यात डेंग्युचा व इतर औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्यात यावा. यंदा ब-यापैकी पाऊस होवून देखील शहरात १५ ते २० दिवसांत पाणी पुरवठा होत आहे तो सुरळीत करण्यात यावा, प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे करण्यात यावी. असे प्रांत व नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. यावर त्वरीत उपाययोजना न केल्यास भविष्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. मोर्चा सर्वप्रथम प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रांत कार्यालयाच्या गेटवर पालिका प्रशासनाच्याकारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली व तेथे ठिय्या मांडण्यात आला. पोलीसांनी समजुत काढल्यानंतर प्रांत यांना निवेदन देण्यात आले. यानंतर नगरपरिषद कार्यालयावर सुध्दा मोर्चा नेण्यात आला. तेथे सुध्दा पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. तेथे शहरातील समस्यांबाबत मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी गटनेते उल्हास पगारे व जनआधारच्या नगरसेवकांनी चर्चा करुन समस्या सोडविण्याची मागणी केली.या प्रसंगी हाजी आशिक खान,इकबाल पहेलवान, संतोष(दाढी)चौधरी, सलीम पिंजारी, प्रदीप देशमुख, दुर्गेश ठाकूर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, ललीत मराठे, शेख इम्तियाज, सिकंदर खान, साजिद शेख, नितीन भालेराव, राहुल बोरसे, शेख जाकीर सरदार, इम्तियाज शेख, माजी नगरसेवक भिमराज कोळी, प्रकाश निकम, रईस लोधी, मुन्ना सोनवणे, सुदाम सोनवणे यांच्यासह मोर्चात परिसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. विविध समस्यांचे फलक हाती घेवून कार्यकर्ते निषेध करतांना दिसून येत होते. पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध घोषणांमधून व्यक्त होत होता.