<
पाचोरा-(प्रमोद सोनवणे)- गो से हायस्कूल पाचोरा येथे आज १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिवस म्हणून साजरा करण्यात आला दिनांक ९/११/१९ ते २३/११/१९ विधी सेवा पंधरवडाचे औचित्य साधुन दिनांक १४/११/१९ रोजी गो से हायस्कूल येथे बाल दिन साजरा करण्यात आला त्या वेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. अध्यक्षस्थानी न्यायाधीश एम एच हक होते. न्यायाधीश जी एस बडगुजर यांनी विधी संघर्ष बालक बाबत विध्यार्थ्यांना माहिती दिली तसेच बाल कामगार यावर रवींद्र पाटील वकील व मोफत सक्तीचे शिक्षण यावर एस पी पाटील वकील यांनी माहिती दिली त्या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष पी बी पाटील, ए जे काटकर, एस बी माहेश्वरी, व्ही ए पाटील, आर आर राजपूत, आर बी परदेशी व बरीच वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने पाचोरा येथील सह न्यायालयाचे न्यायाधीश हक हे अध्यक्ष स्थानी होते, पाचोरा येथील वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील वकील, एस पी पाटील वकील काटकर वकील, संजू नैनाव, रवींद्र एस पाटील सचिव, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सर्व प्रथम पंडित जवाहरलाल नेहरूंच्या फोटोस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, न्यायाधीश तसेच इतर मान्यवरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी मुख्याध्यापक एस डी पाटील, उपमुख्याध्यापक, एस एल वाघ, पर्यवेक्षिका सी एस धुळेकर, क्रीडा प्रमुख एन आर पाटील, आर बी बोरसे, रुपेश पाटील, सागर थोरात पर्यंवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.