<
पारोळा – गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा जि. जळगांव या शाळेतील शैक्षणिक वर्ष २०१४ ते २०१९ या पाच वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि.१८ जुलै २०१९ वार गुरुवार रोजी अमळनेर तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.अंबादासजी मोरे साहेब यांच्या शुभहस्ते विविध थोर पुरूषांच्या जिवनावर लिखित पुस्तके भेट देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन धरणगांवचे सामाजिक कार्यकर्ते खान्देशभुषण श्री.सुनिलभाऊ चौधरी यांनी केले होते.
मुल्यवर्धित शैक्षणिक कार्यक्रमाचे उद्घाटन करुन पो.नि. श्री.अंबादासजी मोरे साहेबांच्या शुभहस्ते जि.प.शाळेच्या एस.टी.व एस.सी.प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाटी व पेन्सिल बाॅक्सचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या आवारात पो.नि. श्री.अंबादासजी मोरे साहेबांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले…
कार्यक्रमास अमळनेरचे पोलीस निरीक्षक श्री.अंबादासजी मोरे श्री.सुनिलभाऊ चौधरी, शेळावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.जितेंद्र पवार सर, छ.कृ.वि.मंडळाचे सचिव बापुसो श्री.लोटन देसले, गजानन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.योगेश सुर्यवंशी सर, जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पाकिजा पटेल मॅडम, सौ.बोरसे मॅडम, सौ.देसले मॅडम तसेच गजानन माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु व भगिनी उपस्थित होते..
सदर कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष व अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा.आ. दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, सचिव बापुसो श्री.लोटन देसले, राजवड (आदर्शगांव), खेडीढोक, दगडीसबगव्हाण गावातील पालकांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.बबिता पटेल मॅडम व श्री.ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले. श्री.स्वप्निल पवार सरांनी आभार मानलेत.