<
एरंडोल(प्रतिनीधी)- स्वातंत्र्यसेनानी आदिवासी भगवान जननायक बिरसा मुंडा यांची जयंती गालापूर ता. एरंडोल जि. जळगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, आदिवासी समाजाला न्यायाच्या भूमिकेतूनआणून गरिबी दुर्बल परिस्थितीतही संघर्षाने जीवन घडविता येते याचा मूर्तिमंत आदर्श जननायक बिरसा मुंडा यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या जीवनातून सबंध देशाला प्रेरणा मिळते. कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, सुनील बिल राकेश माळी सीमा सोनवणे सखाराम सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी मागील चार वर्षापासून किशोर पाटील कुंझरकर करीत असलेले प्रबोधन प्रेरणादायी असल्याचे सुरेश भील म्हणाले. शालेय विद्यार्थी पालक माता पालक संघ व मान्यवरांनी यावेळी बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या माहितीने आनंद व्यक्त केला.