<
जळगाव येथे अग्रो वर्ल्ड आयोजित भव्य कृषी प्रदर्शनात आज आदर्श कृषी उद्योजक व आदर्श कृषी अधिकारी पुरस्कार वितरण खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते संपन्न
जळगाव(प्रतिनीधी)- कृषी तंत्रज्ञान संशोधन शेतीला समृध्द करणार असून या आधुनिक तत्रद्यानाची ओळख सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावी यासाठी अग्रों वर्ल्ड ने पुढाकार घेत प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.जगात होणारे शेतीला समृध्द करणारे बदल आपल्या गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात अशा प्रदर्शनाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे शेतीला अधिक समृध्द करण्यासाठी सातत्याने अशी कृषी प्रदर्शने भरविण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले आहे ते आज जळगाव येथे अग्रो वर्ल्ड आयोजित भव्य कृषी प्रदर्शनात बोलत होते. त्यांच्या हस्ते आदर्श कृषी उद्योजक व आदर्श कृषी अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी शहराचे आमदार राजू मामा भोळे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अग्रो वर्ल्ड चे संपादक तथा आयोजक शैलेश चव्हाण, यावल पंचायत समितीच्या सभापती सौ. चौधरी, प्लंटों चे संचालक स्वप्नील चौधरी, क्वालिटी ठिबक चे संचालक रमेश पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, विकास दूध चे एम.डी. सुशील कुमार गौतम, राम बायोटक चे पुष्पराज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश पाटील यांनी कृषी प्रदर्शनातील सर्वच स्टॉल वर जाऊन माहिती घेतली. याप्रसंगी कृषी उप संचालक अनिल भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले खासदार उन्मेश पाटलांची नेहमी कृषी विषयां मध्ये रुची राहिली आहे.काल जयपूर येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभे केलेल्या दूध उद्योगाची पाहणी करायला गेले होते तेथून आजच्या प्रदर्शनाला उपस्थित राहता यावे म्हणून त्यांनी मोठा प्रवास केला आणि आज प्रदर्शनाला भेट दिली. त्यांची ही धडपड वाखाणण्यासारखी असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास होणार आहे. चाळीसगाव येथे त्यांनी आयोजित केलेल्या शासकीय योजनाची जत्रा ही राज्यात भूषणावह ठरली. असे ते म्हणाले. खासदार उन्मेश पाटिल यांचा नेहमी मोठे पाठबळ आमच्या पाठीशी असल्याने यापुढे देखील अशी कृषी प्रदर्शने तालुका पातळीवर आयोजित केली जातील अशी भावना अग्रौ वर्ल्ड चे संपादक शैलेश चव्हाण यांनी व्यक्त केली.