<
एरंडोल(शैलेश चौधरी) एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची बैठक शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जळगांव जिल्हा अध्यक्ष विकास महाजन (पारोळा) यांच्या अध्यक्षतेखाली एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीच्या उपाध्यक्षा सौ.मीनाक्षी पाटील यांच्या आदर्श नगर , एरंडोल येथील निवासस्थानी मोठया उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस एरंडोल तालुक्यात मोठया प्रमाणावर साजरा करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.तसेच१५ डिसेंबर२०१९ ते ३१डिसेंबर २०१९ दरम्यान ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करण्याचे शासनाचे नियोजन असल्याची माहिती विकास महाजन यांनी यावेळी दिली व त्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला जिल्हा संघटक डॉ. अमित पाटील, तालुका अध्यक्षा सौ.आरती ठाकूर, उपाध्यक्षा सौ. मीनाक्षी पाटील, पत्रकार कैलास महाजन, सौ.शोभा साळी, डॉ.राखी काबरा,दीपा आंबटकर,संध्या गुजर, ज्योती भागवत, सारिका राजपूत, सरोज तोतला, रंजना मराठे, मालती पाटील,चंद्रकांत पाटील, उत्तमराव पाटील ,संजय बागड डॉ. प्रशांत पाटील,शालिनी कोठावदे, रघुनाथ कोठावदे, मीना काळे,गौरी मानधुने, पी. जी .चौधरी सर,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्र संचालन सौ.आरती ठाकूर यांनी केले तर आभार सौ. मीनाक्षी पाटील यांनी मानले.