<
एरंडोल (शैलेश चौधरी ) येथील माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांचे सुपुत्र संघरत्न गायकवाड यांची ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स नाशिकतर्फे ‘कृषिथॉन युवा सन्मान २०१९’ राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यातील प्रयोगशील युवा उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती २१ नोव्हेंबर रोजी आंतराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या १४ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले असुन त्यांना यावेळी ‘प्रयोगशील युवा उद्योजक’ म्हणुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील शेतकरी व कृषी संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संघरत्न शालिग्राम गायकवाड यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष रतनलालजी बाफना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘अॅग्रोवर्ल्ड कृषी सेवा, पुरस्कार व ‘कृषी सन्मान, पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी रतनलालजी बाफना यांनी सांगीतले की अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला व हाताळायला मिळत आहे, त्यामुळे त्यांचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला आहे. शेती हा आज खऱ्या अर्थाने मुख्य अर्थार्जनाचा स्रोत आहे. अॅग्रोवर्ल्डच्या या प्रदर्शनामुळे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही पूर्वीच्या काळी असणारी म्हण आज सार्थ होताना दिसत आहे. संघरत्न गायकवाड यांच्या या प्रेरणादायी वाटचालीचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. याप्रसंगी जिल्हा कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, नाबार्डचे जिल्हा प्रमुख श्रीकांत झांबरे, प्लांन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नंदिनीबाई जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य सी. एस. पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्डच्या पहिल्या दोन दिवसात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली.