<
जळगाव – केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन २०१९ च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणा-या दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना सन २०१९ चे पुरस्काराच्या अर्जाचे वाटप हे १८ जुलै, २०१८ ते ३१ जुलै, २०१९ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळुन उपलब्ध करुन देण्यात येतील. अर्जदारांकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज १० आगष्ट, २०१९ पुर्वी स्वीकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. सदरचे अर्ज १५ ऑगष्ट, २०१९ पुर्वी आयुक्तालयास सादर करावयाचे असल्याने वेळेत अर्ज करावा. सदरहू अर्ज केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप
उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा-या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रतीथयश व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या उत्कृष्ट संशोधन/उत्पादन/निर्माती, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/संस्था, दिव्यांग व्यक्तींना पुर्नवसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अंपग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणा-या प्रौढ दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक, उत्कृष्ट ब्रेल कारखाना, उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट कार्य करणारी दिव्यांग व्यक्ती यानुसार पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात इंग्रजीत व हिंदी मध्ये तीन प्रतीत मुदतीच्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचेकडे सादर करावे, असे संबंधितांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.