<
एरंडोल-(शैलेश चौधरी) – येथे रविवारी भरणार्या आठवडे बाजाराचे नियोजन नसल्याने स्थानिक तसेच विक्रेते, तालुक्यातील खेड्यापाड्यांतील विक्रेते यांनी फकीरवाडा येथुन थेट म्हसावद नाका परीसरातील वीर भाई कोतवाल चौकापर्यंत तसेच श्री.उपनगराध्यक्ष श्री.अशोक चौधरी यांच्या दुकान व निवासस्थानापासुन ते थेट मरीमाता मंदीराच्या आजूबाजूस तसेच पोलिसस्टेशनमार्गे वर्दळीच्या रस्त्याच्या दुतर्फा पंचायत समीतीच्या प्रवेशद्वारा पुढे लांबच लांब क्रमाने आपल्या विक्रीयोग्य उत्पादनासह ठाण मांडुन बसलेले असतात.फकीर वाडा ते विर भाई कोतवाल चौकापर्यंत तसेच मरीमाता मंदीरासमोरील रस्त्यावर दुतर्फा विक्रेते तर बसतातच पण वाहतुकीला प्रचंड ञास होत असतो, तसेच मरीमाता मंदीराजवळ औरंगाबादला म्हसावद, शिरसोली, पहूर, औरंगाबादकडे जाणारा महामार्ग असल्याने या ठीकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अनेक अवजड वाहने ही या मार्गावरून जात असल्याने एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. बाहेरील विक्रेते जागा मिळेल त्या ठिकाणी आपले दुकान मांडुन बसतात व कमिटी गोळा करणारी मंडळी प्रत्येकाकडून आठवडे बाजाराची कर आकारणी करतात. पण विक्रेत्यांना नियोजित जागा मिळत नसल्यामुळे दमछाक होते व ईतरञ ठाण मांडावे लागत असल्याचे पहावयास मिळते, लोकप्रतिनीधींना या बाबत काही एक घेणे-देणे नसल्याचे दिसते. आठवडे बाजाराचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाल्यासारखे असल्याने विक्रेत्यांकडून रोषपूर्ण विधाने ऐकायला मिळतात. बाजाराचा दिवस असल्याने ग्राहक पोलिस स्टेशन च्या प्रवेशद्वाराजवळ तसेच रहदारीमार्गात गाड्या लावत असतात. एकंदरीत न. पा. प्रशासनाची उदासिनता व लोकप्रतिनीधींना कोणतेही सोयरसुतक पडत नसल्याचे विदारक चिञ दिसते.